आंबा घाट
आंबा घाट हा कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर, कोल्हापूरपासून सुमारे 65 कि.मी. अंतरावर पश्चिम घाटाच्या माथ्यावर वसलेले एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. हिरव्यागार डोंगररांगा, दाट जंगले, धुक्याने वेढलेले घाटमार्ग आणि आल्हाददायक हवामान यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
आंबा घाट ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती, छायाचित्रण आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुमारे दोन तासांचा ट्रेक दाट जंगलातून जातो आणि शेवटी कोकण किनारपट्टी तसेच दख्खन पठाराचे मनोहारी विहंगम दृश्य पाहायला मिळते.
पावसाळ्यात धबधबे, धुके आणि हिरवाईमुळे आंबा घाटाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे भेट देतात.
जवळील पर्यटनस्थळे :
- पावनखिंड – 12 कि.मी.
- विशाळगड किल्ला – 25 कि.मी.