कात्यायनी देवीचे मंदिर कोल्हापूरपासून सुमारे पाच मैल दक्षिणेला असलेल्या कात्यायनी टेकडीवर वसलेले आहे. या टेकडीचे मुख्य आकर्षण म्हणजे निसर्गरम्य वातावरणात उभारलेले कात्यायनी देवीचे सुंदर मंदिर.


हे मंदिर दगडी बांधकामाचे प्राचीन मंदिर असून त्याची लांबी ४० फूट, रुंदी २० फूट आणि उंची १२ फूट आहे.


हिंदू धर्मीयांमध्ये कात्यायनी देवीला अत्यंत मानाचे स्थान आहे. करवीर पुराणामध्ये देवी कात्यायनीचा उल्लेख महालक्ष्मी देवीच्या महान सहाय्यक म्हणून करण्यात आला आहे.


या टेकडीवरून उगम पावणारा कात्यायनी ओढा हा कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रमुख जलस्रोत आहे.


 


मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे ठिकाण कोल्हापूरकरांचे आवडते सहलीचे आणि पिकनिकचे स्थळ बनले आहे.