भुदरगड किल्ला

भुदरगड किल्ला

स्थान:कोल्हापूरपासून ५० किमी दक्षिणेस
पायथा गाव:पुष्पनगर
उंची:९४० मीटर (समुद्रसपाटीपासून)

संक्षिप्त इतिहास:
भुदरगड किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजा भोज द्वितीय यांनी केली. इ.स. १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून येथे सैनिकी तळ उभारला. नंतर तो मोगलांच्या ताब्यात गेला, पण काही वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १८४४ मध्ये इंग्रजांनी जनरल डेलामोट यांच्या नेतृत्वाखाली किल्ला जिंकून त्याचा काही भाग पाडला.

पाहण्यासारखी ठिकाणे:

  • भवानी मंदिर आणि दूधसागर तलाव
  • पूर्वेकडील प्रवेशद्वार
  • शिव मंदिर
  • दीपमाळ
  • पूर्व बुरूज
  • जाखीण गुहा

राहण्याची सोय:
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. मुक्कामासाठी गारगोटी येथे जावे लागते.