दोनवडे धबधबा

दोनवडे धबधबा

दोनवडे धबधबा हा कोल्हापूर शहरापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर भुदरगड तालुक्यातील एक प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. सध्या हा धबधबा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनला असून जुलै ते मार्च या कालावधीत येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.


 


दोनवडे हे गारगोटीपासून सुमारे १० ते १५ कि.मी. अंतरावरील छोटेसे गाव आहे. या गावाच्या पश्चिमेस सुमारे २ कि.मी. अंतरावर एकाच परिसरात तीन सुंदर धबधबे आहेत. हे धबधबे अनुक्रमे सवत कडा, जांभूळ कडा आणि डुक्कर कडा या नावांनी ओळखले जातात. हिरवाईने नटलेला परिसर, उंच कडे आणि कोसळणारे धबधबे यांमुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्र आहे.