स्वप्नवेल पॉइंट
स्वप्नवेल पॉइंट हे तिलारी नगरापासून सुमारे १० ते १२ कि.मी. अंतरावर असलेले एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथून दिसणारी हिरवाईने नटलेली खोल दरी, धुक्याने वेढलेले डोंगर आणि मनमोहक निसर्ग पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. धबधबे, ढगांनी वेढलेले पर्वत आणि दाट हिरवाई यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्र आहे. वर्षातून किमान एकदा तरी, विशेषतः पावसाळ्यात, या स्थळाला भेट देण्यासारखे आहे.