हातकणंगले
हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून कोल्हापूर, इचलकरंजी, भादोले आणि सांगली या शहरांच्या जवळ असल्यामुळे वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर आहे. मिरज–कोल्हापूर रेल्वेमार्गावरील हातकणंगले रेल्वे स्थानक तसेच उत्तम रस्ते सुविधा यांमुळे या परिसराचा शेजारील शहरांशी चांगला संपर्क आहे.
हातकणंगलेमध्ये वस्त्रोद्योग तसेच लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. अनेक नागरिक रोजगारासाठी इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली येथे दररोज प्रवास करतात.
या तालुक्यात पाण्याची उपलब्धता चांगली असून सिंचन सुविधांमुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. अनेक शेतकरी वर्षातून दोन किंवा अधिक पिके घेतात. ऊस, ज्वारी, सोयाबीन आणि भुईमूग ही येथील प्रमुख पिके आहेत.