आणुस्कुरा घाट

आणुस्कुरा घाट

आणुस्कुरा घाट हा कोल्हापूरपासून सुमारे ६५ कि.मी. पश्चिमेस असलेला एक निसर्गरम्य घाट आहे. हा घाट पश्चिम घाटातील दाट जंगल, डोंगररांगा आणि पावसाळ्यातील धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.


 


येथील आणुस्कुरा धबधबा हा मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर दिसतो. हिरवागार निसर्ग, धुके आणि वाहणारे पाणी यामुळे हे ठिकाण पर्यटक आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनते.